Home Breaking News मधमाशांच्या हल्ल्यात पाच ते सहा जण जखमी

मधमाशांच्या हल्ल्यात पाच ते सहा जण जखमी

190
3D Rendered Apis Mellifera 'Honey Bee'

 

चिंचपूर :- खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामनवमीनिमित्त कथा वाचन श्री श्रृंग ऋषी संस्थान चिंचपूर येथे करण्यात येते याही वर्षी गावापासून एक ते दीड किमी अंतरावर जंगलात असलेल्या निसर्गरम्य पर्यटन स्थळी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामुळे सकाळपासून अंदाजे तीनशे पेक्षा जास्त महिला पुरुषांनी प्रसाद घेतला व श्रृंग ऋषी संस्थान येथून घरी परतले होते.

व उपस्थित शंभर ते दीडशे भक्त भंडार्यात प्रसाद घेत होते त्यावेळी अचानक वडाच्या झाडावर असलेल्या मधमाशांनी नयना हिवराळे या महिलेवर हल्ला चढविला त्यामुळे तिथे उपस्थित महिला बालक सर्व गोंधळून गेले त्यांना सावरण्यासाठी उपस्थित नागरिकांनी पुढाकार घेऊन सर्वांना तिथून इतरत्र हलविले त्यांना हलवीत असताना अचानक नामदेव रोडे यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला जीवाच्या आकांताने त्यांनी पळत जाऊन विहिरीत उडी मारले पण पोहता येत नसल्याने

त्यांनी भुचकड्या खाल्ल्या त्यावेळी प्रसंगावधान राखत राम शेळके यांनी जीवाची परवा न करता विहिरीत उडी मारून नामदेव रोडे यांना सुखरूप वर काढले.

या मधमाशांच्या हल्ल्यात गावातील इतरही बरेच जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे

Previous articleमूर्तिजापूर शहरात 4 एप्रिल रोजी स्वा. वि.दा. सावरकर गौरव यात्रा..!
Next articleनिवृत्तीराव गायकवाड यांची नियुक्ती: