Home Breaking News कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेवटच्या दिवशी १४४अर्ज दाखल

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेवटच्या दिवशी १४४अर्ज दाखल

385

 

यावल (प्रतिनिधी):-विकी वानखेडे

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होणार्‍या १८ संचालक मंडळाच्या निवडीसाठी होवु घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि.३ सोमवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९५ उमेदवारांनी आपले १४३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठीपर्यंत उमेदवारी अर्जांची संख्या १४३ झाली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांसह सूचक अनुमोदक व समर्थकांची मोठी गर्दी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात उसळली होती.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी ९५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे

.मतदार संघनिहाय एकूण दाखल झालेले उमेदवारी अर्ज असे विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघ ६७,ग्रामपंचायत मतदार संघ ४५,व्यापारी मतदार संघ १६,हमाल तोलारी मतदार संघ १३ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सदरील माहिती पत्रकारांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापाल पी.एम.चव्हाण यांनी दिली आहे.

या निवडणुकीचे निवडणुक निरिक्षक म्हणुन तहसीलदार महेश पवार हे काम पाहात आहे.निवडणुकीबाबत अद्यापि चित्र स्पष्ट झालेले नसल्याने उमेदवारांच्या माघारीनंतर तसेच अर्जाच्या छाननीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Previous articleनिवृत्तीराव गायकवाड यांची नियुक्ती:
Next articleदहा दिवशीय श्रामनेर शिबीराची यशस्वी सांगता