Home Breaking News रोकडीया नगर मध्ये श्री हनुमान जन्म उस्तव साजरा तर साफसफाई नकेल्याने न....

रोकडीया नगर मध्ये श्री हनुमान जन्म उस्तव साजरा तर साफसफाई नकेल्याने न. प. वर नाराजी

276

 

विठ्ठल अवताडे शेगाव

स्थानिक रोकडीया नगर येथील श्री संकट मोचान हनुमान मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे श्री हनुमान जन्म उत्सव सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते ,

या वर्षी देखील जन्म उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी नगरपरिषद मध्ये तोंडी मागणी केली होती तरी नगर परिषद कडून साफसफाई न करता तिथल्या नालिमध्ये तसाच कचरा आणि घान होती ,

यांकडे नगर परिषद कडून दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे , त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सुर आहे , त्यामुळे भविष्यात या मंदिर समोरील नालीमध्ये पाईप टाकून किंवा नाली बांधून देण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे ,

त्यामुळे आता नगर परिषद कडून लवकरात लवकर या ठिकाणी पाईप टाकण्यात यावे ही मागणी नागरिक करीत आहेत

Previous articleमनसेचा शेवटचा इशारा आता “ठोकणार मंजे ठोकणार”
Next articleविराज देवकांत पाटील यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा विरावली येथे संगणक भेट म्हणून देण्यात आले