Home Breaking News विहिरीत कुजबजलेला मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

विहिरीत कुजबजलेला मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

591

 

मूर्तिजापूर:- तालुक्यातील जांबा बुद्रुक येथे विहिरीत कुजबजलेला मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
जांबा बुद्रुक या गावाला पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणाऱ्या विहिरीत एक कुजबजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे सदर मृतदेह गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून गावाला पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणाऱ्या विहिरीत पडून असल्याने मृतदेह पुरुषाचा की महिलाचा याची ओळख पटविण पोलिसांसमोर एक आव्हानच ठरत आहे.

मात्र या घटनेमुळे जांभा बुद्रुक वासियांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती कळताच मूर्तिजापूरचे आपत्कालीन पथकाचे सेनापती, अमोल खंडारे, बादशाह,सुमित यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून मोठ्या कसरतीने बाहेर काढला,पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत सुरु आहे.
———————
*कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतिनिधी प्रतिक कुऱ्हेकर सूर्या न्युज मराठी अकोला.*

Previous articleविराज देवकांत पाटील यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा विरावली येथे संगणक भेट म्हणून देण्यात आले
Next articleयावलला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थित विविध शासकिय योजना आढावा बैठक व आदीवासी महीला बचत गट भोजनालयाचे उद्धाटन