Home वर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धा जिल्हयात अधिक बळकट करण्यासाठी अतूल वांदिलेंना पवारांचे कानमंत्र…..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धा जिल्हयात अधिक बळकट करण्यासाठी अतूल वांदिलेंना पवारांचे कानमंत्र…..

227

 

अतुल वांदीलेंना नागपूर येथे बोलावून घेत झाली संघटनात्मक चर्चा…..

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्याशी सखोल चर्चा केली. नागपूर येथील रेडीसन ब्ल्यू हॉटेल येथे शरद पवार आले असता ही संघटनात्मक चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रातील ताकतवर व्यक्तींचां पक्षात प्रवेश केला जाणार आहे. राज्याचे सरकार हे अस्थिर असून केव्हाही निवडणुकांना पुढे जावे लागू शकते, यासाठी म्हणून पक्षाची तयारी ही त्या दृष्टिकोनातून करण्याबाबत देखील सविस्तर चर्चा झाली.

अतुल वांदिले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होऊन एक वर्ष झाले .या वर्षभरामध्ये सात हजारांच्या वर कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणण्याचे अतुल वंदिले यांनी केलेल्या कामाचे शरद पवार यांनी कौतुक केले.

यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखिल उपस्थीत होते.तर या भेटीदरम्यान माजी केंद्रीय मंत्री व वर्धा जिल्हा संपर्क अध्यक्ष सुबोध मोहिते यांनी वर्धा जिल्हात पक्ष बळकट करण्यादरम्यान आलेल्या अनेक आव्हानांन बद्दल देखिल शरद पवारांना अवगत करून दीले.

यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, ओ. बी. सी. सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे , पवन तिजारे, दशरथ ठाकरे,अमोल बोरकर, रोशन तेलंगे, प्रशांत लोणकर आदी उपस्थित होते.

Previous articleयावलला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थित विविध शासकिय योजना आढावा बैठक व आदीवासी महीला बचत गट भोजनालयाचे उद्धाटन
Next articleउपविभागीय पोलीस अधिकारी बाळापुर यांच्या विशेष पथकाची वरली जुगारावर धाड