प्रतिनिधी गणेश भाकरे मोरगांव भाकरे
दिनांक 8 एप्रिल रोजी पोस्टे पातूर हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज जी साहेब बाळापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश महाजन , पोहेका सय्यद शारीक सय्यद रउफ, सुधाकर करवते, उज्वला इटिवाले/ बगेवार, गजानन शिंदे, विठ्ठल उकर्डे, कबीर खान यांनी.
पातूर येथील विजय टॉकीज जवळ टीन पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या वरली जुगारावर धाड टाकून ७ आरोपी आरोपी ताब्यात घेतले. त्यामध्ये आरोपी ,पंजाब अवचार, रमेश गायकवाड, मोहम्मद शरीफ मोहम्मद शकील. भास्कर माहूलीकर,मो शरिक मो. सिकंदर, संतोष कांबळे,राजेश राठोड या ७ आरोपींना ताब्यात घेतले.
यांच्याकडून जुगार साहित्य एक मोसा व नगदी रुपय असा एकूण 96320 रुपये चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला.
यातील एक आरोपी मो. रुस्तम जमादार हा पसार झाला या सर्वांना पोलीस स्टेशन पातुर येथे आणून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4,5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.