इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
खामगाव येथील घाटपुरी येथे असलेल्या कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या मंदिरावर संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त 18 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन
कुंभार समाज कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. घाटपुरी येथे संत शिरोमणी श्री गोरोबाकाका मंदिर येथे मंगळवार 18 एप्रिल रोजी संत शिरोमणी गोरोबाकाका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.
यानिमित्त 18 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता वडगाव डिघी येथील ह भ प श्री वसंता महाराज कापडे यांच्या मधूर वाणीमध्ये काल्याचे किर्तन होणार असून इतरही विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत .
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कुंभार समाज सामाजिक संस्था बुलढाणा जिल्हा अध्यक्ष एडवोकेट राजीव मंगळवेढे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र कुमार टाके, जिल्हा सचिव रामेश्वर कापडे, खामगाव तालुकाध्यक्ष विनोद लाऊडकार, खामगाव तालुका उपाध्यक्ष हरिदास बावस्कार, तालुका कृषी अध्यक्ष अंबादास थोटे कुंभार समाज सामाजिक संस्था महिला आघाडीच्या महाराष्ट्रप्रदेश सरचिटणीस ज्योतीताई बावस्कर, विदर्भ प्रदेशाध्यक्ष सौ.शकुंतलाताई जैताळकर, बुलढाणा जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ किरण ताई हरिभाऊ लंगोटे खामगाव तालुकाध्यक्ष मंगलाताई रामभाऊ हिवरकर खामगाव तालुका उपाध्यक्ष कौशल्यताई लाहुडकार, खामगाव तालुका सचिव सो नर्मदा संतोष इंगळे महिला आघाडी खामगाव शहराध्यक्ष सौ प्रतिभाताई उज्वल लाऊडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर समिती घाटपुरी खामगाव, खामगाव शहर व तालुका कुंभार समाज याचप्रमाणे कुंभार समाज महिला आघाडी आणि पुरुष आघाडी चे पदाधिकारी समाज बांधव परिश्रम घेत आहेत.
18 एप्रिल रोजी आयोजित कुंभार समाजाचे आराध्य संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजाची एकता प्रदर्शित करावी असे आवाहन कुंभार समाज सामाजिक संस्था बुलढाणा जिल्हाध्यक्ष एडवोकेट राजीव मंगळवेढे, जिल्हा सचिव रामेश्वर कापडे महिला आघाडीच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षा सौ.किरणताई हरिभाऊ लंगोटे यांनी केले आहे