Home जळगाव दहीगावमध्ये महापुरुष डॉ .बाबासाहेब यांच्या फलकाची विटंबना तणावपूर्ण शांतता पोलीसांचा तगडा बंदोबस्त

दहीगावमध्ये महापुरुष डॉ .बाबासाहेब यांच्या फलकाची विटंबना तणावपूर्ण शांतता पोलीसांचा तगडा बंदोबस्त

691

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील दहिगाव येथील गावातील मुख्य चौकातील महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताच्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असुन , गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

घटनेची खबर मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस अधिक उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचत शांततेचे आव्हान केले आहे दरम्यान गावातील वातावरण तणावपूर्ण शांत असून सर्व शेतीचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत पोलीस बंदोबस्त तैनात असून उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे राकेश मानगावकर ,पोलीस अधिकारी व ताफ्यासह तळ ठोकून आहेत

तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमेची शनिवारी रात्री दहा वाजेवाजेचे सुमारास अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली.

रविवारी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच, मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन दिले पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले.

या प्रसंगी सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांचे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर गंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनील मोरे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांचे सह पोलीसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. ,

दरम्यान महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा फलक विटंबना प्रकरणी पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पत्रकारांना दिली. दहिगाव गावात विटंबनानंतर तणावपूर्ण वातावरण असल्याने यावल दहिगाव सावखेडा बस सेवा सकाळ पासून बंद करण्यात आली आहे .

Previous articleयावल पंचायत समिती येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी
Next articleसर्वधर्म समभाव भावनेतून नायगाव येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन कार्यक्रमाला आमदारांसह सर्वधर्मीय प्रतिष्ठित उपस्थित