Home बुलढाणा भोई समाजाच्या लेकीचे बलीदान वाया जाऊ देणार नाही आंदोलनाचा इशारा मेल्या नंतर...

भोई समाजाच्या लेकीचे बलीदान वाया जाऊ देणार नाही आंदोलनाचा इशारा मेल्या नंतर सांत्वन केल्या पेक्षा भोई समाजाला जिवंत पणी घरकुल द्या.

298

 

श्री देवानंद आमझरे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष निषाद पार्टी

संग्रामपूर: काटेल येथील भोई समाजाचे बोरवार कुटुंबाच्या घराची भिंत कोसळून एका चिमुकलीला जिव गमावा लागला असून एक चिमुकली जखमी आहे,असा दुःखाचा डोंगर काटेल येथील बोरवार कुटुंबावर कोसळा असता निषाद पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष देवानंद आमझरे आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी धाव घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन सांत्वन केले

व घाराची पाहणी केली असता, शासन आणि सरकार यांची शर्मनाक बाब समोर आली की काटेल येथे पिढ्या न पिढ्या राहत असलेल्या भोई समाजाला स्वताची जागा आणि राहायला घरे नसून मजबुरीने कुळा मातीच्या घरात वास्तव्य करत असताना,

तेथील भोई समाजाने संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा धाव घेऊन घरकुलाची मांग केली होती आणि उपोषणाला सुध्दा बसले होते तरी सुद्धा कोणत्याही अधिकारी किंवा सरकारला दया आली नाही आणि सरकारच्याच बेटी बचाव बेटी पढाव च्या उपक्रमात एका भोई समाजाच्या चिमुकलीला घरकुला पासून वंचित असल्यामुळे अंगावर भींत कोसळल्या मुळे जीव गमावा लागला.

आता हे अपघाती मरण की हत्या, याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समोर बोलताना देवानंद आमझरे बोलत होते की या भोई समाजाच्या लेकीचे बलीदान वाया जाऊ देणार आणि या चिमुकली चे बलिदान भोई समाजाला नक्कीच न्याय मिळवून देईल, जर या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत किंवा भोई समाजाला घरकुल न मिळाल्यास किंवा अशा घटना पुढे न घडाव्यात म्हणून निषाद पार्टी च्या वतीने आंदोलनचा इशारा देण्यात आला

असून खालील कार्यकर्ते श्री देवानंद आमझरे, श्री रमेश भाऊ नांदणे श्री मारोती भाऊ बोरवार, श्री अशोक भाऊ नांदणे, श्री महेश भाऊ नांदण़े, भागवत नांदणे आणि समस्त भोई समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleशेतकऱ्यांसाठी काम करणारे शेतकरी पुत्र नितीनकुमार पहुरकार यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
Next articleयावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शंभर उमेदवारीअर्ज माघार महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल तर तर भाजप शिवसेनेचे सहकार पॅनल मध्ये समोरासमोर लढतीचे चित्र स्पष्ठ