Home Breaking News कांचनपूर येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी

कांचनपूर येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी

67

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे नॅशनल अँटी करप्शन अँड क्राइम ब्युरो संघटने कडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

याबाबत नॅशनल अँटी करप्शन अँड क्राइम ब्युरो संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह कांचनपूर येथील महिला भगिनींनी आज अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर त्यांच्याकडे वरील मागणी संदर्भात निवेदन सादर केले या निवेदनामध्ये म्हटले आहे

की कंचनपुर गावातील अवैध सुरू असलेली दारू विक्री तत्काळ बंद करावी याकरिता पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीच कारवाई झाली नाही.

त्यामुळे याबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी, तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर गावातील अनेक महिलांच्या सह्या आहेत

Previous articleयावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शंभर उमेदवारीअर्ज माघार महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल तर तर भाजप शिवसेनेचे सहकार पॅनल मध्ये समोरासमोर लढतीचे चित्र स्पष्ठ
Next articleकांचनपूर येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी