Home बुलढाणा शेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेगाव तालुक्यातील पालोदी या गावात सार्वजनिक रस्त्यावर...

शेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेगाव तालुक्यातील पालोदी या गावात सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे 

311

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शेगाव तालुक्यात असलेल्या पाळधी या लहानशा गावात भास्कर भेंडे यांच्या.

घराजवळ हनुमान मंदिराच्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच बैलपोळा भरण्यासाठी राखीव असलेल्या सार्वजनिक जागेवर विलासराव ज्ञानदेव जंजाळ हरिभाऊ ज्ञानदेव जंजाळ व दिनकर विलासराव जवंजाळ यांनी तीन पत्रे व चाराचा कंपाउंड बांधून अतिक्रमण केलेले आहे.

त्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे सदर अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी आज 25 एप्रिल मंगळवार रोजी पाळधी येथील शशिकांत अनंतराव भेंडे एकनाथ निनाजी तायडे विष्णू वासुदेव आखरे श्रीकृष्ण रामचंद्र भेंडे विजयाराव भेंडे प्रमोद भेंडे शंकर भेंडे गोपाल भेंडे योगेश भेंडे ब्रह्मदेव भेंडे बाळकृष्ण भेंडे माणिकराव भेंडे धीरज भेंडे मोहन भेंडे दत्तात्रय भेंडे शिवाजी भेंडे गजानन भेंडे अनिल भेंडे गणेश भेंडे सुरेश भेंडे शिवाजी भेंडे प्रमोद फुलकर व रवींद्र फुलकर आदी गावकरी शेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे

Previous articleकांचनपूर येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी
Next articleशेगावात ऑल इंडिया मुशायरा चे आयोजन