Home बुलढाणा शेगावात ऑल इंडिया मुशायरा चे आयोजन

शेगावात ऑल इंडिया मुशायरा चे आयोजन

103

 

२९ एप्रिल रोजी प्रसिद्ध कवीकडून रंगणार मैफल !

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव : (प्रतिनिधी) दि २७ हिंदी आणि उर्दू कविता, नज्म, गझल, गीत यांचा सुरेख संगम साधलेला एक आगळा वेगळा कार्यक्रम ऑल इंडिया मुशायरा २९ एप्रिल रोजी शेगाव शहरात रंगणार आहे.

अमरावती विभागाच्या उर्दू टीचर्स असोसिएशन कडून २९ एप्रिल रोजी शेगाव येथील हॉटेल विघ्णहर्ता इन येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित ईद मिलन, पुस्तक विमोचन व कवि सम्मेलन यामध्ये ऑल इंडिया मुशायरा या विशेष कार्यक्रमांचे आकर्षण राहणार आहे.

यावेळी प्रसिद्ध कवी मोहम्मद फारुख यांच्या अलफाज का चेहरा या ग़ज़ल संग्रहांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटन पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश गायकवाड (आग़ाज़ बुलढाणवी) यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात विशेष सत्कारमूर्ती म्ह्णून उर्दू टीचर्स असोसिएशन चे अमरावती विभागीय अध्यक्ष ग़ाज़ी जाहेरोश सर आणि पत्रकार फहीम देशमुख यांचा विशेष गौरव या कार्यक्रमात होणार आहे.

या मुशायऱ्यामध्ये प्रसिद्ध कवी हामिद भुसावली, नईम फराज, मुजावर मालेगावी, शकील मेवाती, पीरजादा शारिक अहमद नासिक, डॉ इफ्तिखार शकील रायचूर कर्नाटक, डॉ साहिर करीम (शायर शेगानवी), अत्हर नईमी धुलिया, अदीब अलीमी अमरावती, डॉ कमर सुरूर अहमदनगर, हुनर पुणे, रफीक काजी पुणे, उध्दव महाजन, बिस्मिल पुणे, हाजरा ज़रयाब अकोला, अक्रम कुरैशी जलगांव, इम्रान सानी बुलढाणा, इम्रान फारिस जलगांव, गुलाम गौस अजहर नासिक, अमीन खान वसीम खामगाव, मतीन तालिब नांदुरा, अज़हर आतिफ नांदुरा, आकिब ज़मीर चिखली आपले गीत, गझल आणि कविता आपल्यासमोर प्रस्तुत करतील.

सकस आणि मधुर शब्दांनी विणलेले काव्य मैफिलीत रसिकांना अनुभवयाला मिळणार आहे. सादर होणाऱ्या कविता वीर रस, हास्य रस, शृंगार रस आदी बांधणीतल्या आहेत. या विविध कार्यक्रमांसह शिरखुर्म्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन अनीस अहमद शौक, डॉ. असलम खान, इज़्ज़त उल्लाह खान सर, समीर शेख यांनी केले आहे.

Previous articleशेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेगाव तालुक्यातील पालोदी या गावात सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे 
Next articleकिनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रामार्फत हिवताप जनजागृती मोहीम