चामोर्शी:-तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शंकरपूरहेटी येथे इयत्ता पहिलीत दाखल मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्टार्स प्रकल्पांतर्गत शासनाच्या वतीने मागील वर्षीपासून शाळापूर्व तयारी अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली,गट साधन केंद्र चामोर्शीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शंकरपूरहेटी येथे मुख्याध्यापिका सौ नंदा कोत्तावार,शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोपवार व उपक्रमशील शिक्षिका कु धारणी मॅडम यांच्या उत्तम नियोजनानुसार व चामोर्शी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री हिम्मतराव आभारे,श्री संजय बंडावार व विषय साधनव्यक्ती श्री चांगदेव सोरते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत पहिल्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे अध्यक्ष राजेश्वर मानपल्लीवार smc उपाध्यक्ष हे होते तर उद्घाटक म्हणून विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते हे होते.प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमती व्याहाळकर,सौ राऊत मॅडम,मुख्याध्यापिका सौ नंदा कोत्तावार,अंगणवाडी सेविका सौ मडावी मॅडम शाळेच्या शिक्षिका कु धारणी मॅडम आणि दाखल पात्र विध्यार्थी यांच्या माता भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान शंकरपूरहेटी गावात जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात आली,प्रभातफेरी मध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक,युवकवर्ग,महिलामंडळी,शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रभातफेरी नंतर शाळेत शाळापूर्व तयारी अभियान मेळाव्याचे स्वरूप,उदिष्टे विशद करण्यासाठी शाळेत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.उपस्थित महिला आणि गावातील बहुसंख्य नागरिकांना विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच शाळेत नाव नोंदणी,शारीरिक विकास, बौद्धिक विकास,सामाजिक व भावनिक विकास,भाषा विकास,गणनपूर्व तयारी व समुपदेशन असे सात प्रकारचे स्टाल्स लावण्यात आले होते.
दाखल पात्र विद्यार्थी आणि मातांचे पुस्तक,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री गोपवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु धारणी मॅडम यांनी व्यक्त केले.