Home बुलढाणा गो ग्रीन फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा

गो ग्रीन फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा

183

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहरामध्ये १ मे २०१९ रोजी गो ग्रीन फाउंडेशन ची स्थापना वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन तथा पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली होती.

त्या दिशेने कार्य करीत शेगाव शहरामध्ये श्रम वन, ब्रह्मांडवन, स्मृतिवन, ऑक्सीजन पार्क, न्याय वन व मोक्षवन ची निर्मिती करण्यात आली व जवळपास ६००० वृक्षांची लागवड करण्यात येऊन त्यांचे यशस्वी संवर्धन गो ग्रीन फाउंडेशन करीत आहे.

मात्र या सोबतच पर्यावरण पूरक उपक्रम सुद्धा गो ग्रीन फाउंडेशन करीत असते. म्हणून आजच्या वर्धापन दिनानिमित्त शेगाव येथील बस स्थानक परिसरात गो ग्रीन फाउंडेशन व शेगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच आपले कार्यक्षेत्र सांभाळून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत समाजभान जपणार्या व्यक्तींना गो ग्रीन फाउंडेशनचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. श्री. गोविंदजी जंजाळ (व्यवस्थापक शेगाव आगार) तर प्रमुख अतिथी म्हणून मा. सचिनजी गाडोदिया अध्यक्ष रोटरी क्लब शेगाव, अतीक जी मेमन अध्यक्ष अंजुमन उर्दू हायस्कूल शेगाव, श्रीमती तांबटकर मॅडम बस स्थानक प्रमुख शेगाव, मा. श्री. मोहनजी देशपांडे सेंट्रल रेल्वे शेगाव, दिलीपजी इंगळे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी वर्ग १, नाना पाटिल पञकार तरूण भारत या सर्वांची उपस्थिती लाभली. सर्वप्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशोक जी सुभेदार माजी सैनिक, गोविंद भाऊ आंबुसकर संपादक साप्ताहिक माञृभाषा , गजानन बुडुकले सामाजिक कार्यकर्ता, शितलताई शेगोकार निसर्ग प्रेमी, शंकरराव घाटोळ सेवानिवृत्त शाखा अभियंता, विलास भाऊ इंगळे (म्.रा.प. कर्मचारी) इत्यादी मान्यवरांचा गो ग्रीन फाउंडेशनचे स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेगाव नगर परिषदचे सफाई कामगार, बस स्थानक कर्मचारी, प्रवासी तथा गो ग्रीन फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
गो ग्रीन फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यामध्ये शहरातील नागरीकांचा मिळत असलेला उस्फूर्त प्रतिसाद कायम असाच राहो अशी अपेक्षा फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली…

Previous articleप्रधान तंत्रज्ञ आनंद निकम यांना गुणवत कामगार पुरस्कार प्रदान
Next articleशेगाव येथून महाशिवपुराण कथा स्थळ मैसूर अकोला पर्यंत बस सेवा सुरू करावी महिला प्रवासी संघटनेची मागणी