इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
शेगाव रेल्वे स्टेशनवर गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणारे आर पी एफ चे मुख्य आरक्षक पोलीस हेडकॉन्स्टेबल रंजन तेलंग यांनी शेगाव रेल्वे स्टेशनवर ड्युटी बजावत असताना
शेगाव रेल्वे स्टेशन येथे झालेल्या मोबाइल चोरी प्रकरणी अवघे 24 तासातच रंजन तेलंग यांनी छडा लावत 02 जणांना तर रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशाच्या सामानाची रेकी करत असलेल्या एकाला रंजन तेलंग यांनी ताब्यात घेतले विशेष म्हणजे रंजन तेलंग यांनी तिघांचे पोलिस रिकार्ड चेक करताच तिघेही अट्टल गुन्हेगार असल्याचे समजले.
तिघांनाही मेडिकल केल्यानंतर पुढील कारवाईसाठी शेगाव रेल्वे पोलीस जीआरपी यांच्या सुपूर्द करण्यात आले
रंजन तेलंग यांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले