चिखली* : घटनाबाहय शिंदे – फडणवीस सरकार चुकीचे निर्णय घेत असून महाराष्ट्राची वाट लावत आहे.
त्वरित महाराष्ट्राची अवहेलना थंबवा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेड़ू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे आणि प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे यांनी चिखली येथे ६ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
ते संघटन बंधनीसाठी चिखली येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी सावंद साधला.
डॉ.शिवानंद भानुसे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकरने १४ मार्च रोजी कंत्राटी नौकरभरतीचा काढलेला शासन आदेश तरुणाचे भविष्य उद्धवस्त आणि अंधकारमय करणारा आहे. त्याचबरोबर हे सरकार सातत्याने शेतकरी विरोधी निर्णय घेत असून अस्मानी सुल्तानी संकट राज्यावर असताना हे अयोध्या दौरा करतात.
जाहिरतिवर अमाफ खर्च करीत आहे.शेतीमालाला हमीभाव व दारूमुक्त गाव हे संभाजी ब्रिगेडचे घोषवाक्य आहे.
महागाईने सामान्य मनसाचे कंबरडे मोडले आहे. प्रचंड मोठ्या प्रमानावर बेकरी वाढली आहे. शिक्षण आणि आरोग्याचे तिनतेरा वाजले आहे.
मराठा आरक्षणाचा मराठा ओबीसीकरण एकमेव मार्ग असताना राज्य सरकारच्या अधिकारात असताना राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे. जातनीहाय जनगणना करुन ओबीसी आरक्षणाचे सरक्षण करने आवश्यक असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
कुठलेही समाजकार्य नसताना अप्पा धर्माधिकारी याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. तो पुरस्कार त्वरित परत घ्यावा ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. तो पुरस्कार वितरित करण्यासाठी भर दुपारी कार्यक्रम आयोजित करुण लाखो लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या राज्य सरकरवर सादोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
आशा प्रकारची चाललेली महाराष्ट्राची अवहेलना त्वरित थांबवा अन्यथा संभाजी ब्रिगेड राज्यभर तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकारची असेल.असा इशारा डॉ.शिवानंद भानुसे यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष शिवश्री संतोष गाजरे, गजानन भोयर विभागीय अध्यक्ष, रमेश ढगे विभागीय उपअध्यक्ष,योगेश पाटील जिल्हा अध्यक्ष बुलढाणा उत्तर,विकास खंडागळे जिल्हा अध्यक्ष बुलढाणा दक्षिण ,मदन दहातोंडे,पांडुरंग पाटील,श्रावण भुसारी,आकाश लंबे,अमर पाटील, राजकुमार जाधव,योगेश खेडेकर,सुनील वाघमारे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.