Home बुलढाणा एम आय एम पक्षाच्या शेगाव शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक शेख मुख्तार शेख...

एम आय एम पक्षाच्या शेगाव शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक शेख मुख्तार शेख हाजी बुडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे

144

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज 18 मे रोजी बुलढाणा येथे खासदार बॅरिस्टर असोदद्ऊदीन ओवेसी राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या ऑल इंडिया मजलीस ए इथेहा दूल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बुलढाणा येथे

पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची व मुख्य कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये एमआयएम पक्षाच्या विस्तारासंबंधी चर्चा करण्यात येऊन शेगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक शेख मुख्तार शेख हाजीबुडन यांनी पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याबद्दल व आगामी काळात

होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांची शेगाव शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती एमआयएम पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दानिश शेख यांनी एका नियुक्ती पत्र द्वारे केली आहे

Previous articleसर्व धार्मिक परंपरेला मूठ माती देत केला नवा उपक्रम.
Next articleआरोपी मोहम्मद दानिश याला आजन्म कारावास