सीसीटीव्ही फुटेज ची साक्ष ठरली महत्त्वाची
इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
खामगाव शेगाव येथील जगदंबा चौकातील माऊली टी सेंटर मध्ये झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म करावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात न्यायालयाने तेरा साक्षीदार तपासले .त्यापैकी सीसीटीव्ही फुटेज चा प्राथमिक पुरावा महत्त्वाचा ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार ६ मे २०१८ रोजी आठवडी बाजारातील मोहम्मद शोएब मोहम्मद सलीम या 22 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला होता .दरम्यान पोलिसांनी मोहम्मद दानिश जाहीद हुसेन याच्यासह दोघांविरुद्ध कलम 302 ,201,120 बी,340 नुसार गुन्हा दाखल करत प्रकरण न्यायालयात दाखल केले.
घटनेची पार्श्वभूमी अशी की दि 6मे2018 रोजी मोहम्मद शोएब मोहम्मद सलीम हा माऊली टी सेंटरमध्ये बसलेला होता. दरम्यान संध्याकाळी पावणे सात ते सात वाजताच्या सुमारास आरोपी मोहम्मद दानिश जाहीर हुसेन हा त्या ठिकाणी आला व वाद घालून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व खिशातील चाकूने शोएबच्या मानेवर ,पोटावर व गालावर 19 वार केले .
त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला .त्याला दवाखान्यात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेच्या दोन महिन्यापूर्वी दोघांमध्ये झालेला वाद मिटविण्यात आला होता मात्र पुन्हा हा वाद उफाळून आल्याने सदर घटना घडली होती .
अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एडवोकेट रजनी बावस्कर (भालेराव) यांनी अत्यंत बारकाईने ह्या गुन्ह्यातील मुद्दे न्यासरलयासमोर मांडत प्रभावी युक्तिवाद केल्यानंतर खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी एस कुलकर्णी यांनी आज आरोपी मोहम्मद दानिश याला आजन्म कारावासाची शिक्षा तसेच पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावाचे शिक्षा सुनावली.