Home जळगाव यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी हर्षल पाटील तर उपसभापती दगडु( बबलू)...

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी हर्षल पाटील तर उपसभापती दगडु( बबलू) कोळी यांची बिनविरोध निवड

317

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे हर्षल गोविंदा पाटील यांची तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाये दगडू ( बबलु ) जर्नादन कोळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

आज यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक पंचवार्षीक निवडणुकीत भाजपा शिंदे गटाच्या महायुतीचे १८ पैक्की१५ संचालक निवडुन आले होते .

आज दिनांक १८ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती यावल ची सभापतीपदासाठीची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणुक| निर्णय अधिकारी एफ पी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापतीची निवडणुक पार पडली ,

यात सभापतीपदाची धुरा महायुतीच्या भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषदचे सदस्य तथा विद्यमान संचालक हर्षल गोविंदा पाटील यांची तर उपसभापतीपदी शिवसेना ( शिंदे गट )चे दगडु जर्नादन कोळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

या बैठकीस संचालक हर्षल गोविंदा पाटील , नारायण शशीकांत चौधरी , राकेश वसंत फेगडे , उज्जैनसिंग राजपुत , विलास चंद्रभान पाटील , उमेश प्रभाकर पाटील , संजय चुडामण पाटील , सागर राजेन्द्र महाजन ,पंकज दिनकर चौधरी . कांचन ताराचंद फालक, यशवत माधव तळेले, राखी योगीराज बऱ्हाटे, सुर्यभान निंबा पाटील , दगडु जनार्दन कोळी, अशोक त्र्यंबक चौधरी ,सुनिल वासुदेव बारी, सैय्यद युनुस सैय्यद युसुफ यावेळी

निवडीच्या बैठकीस माजी सभापती हिरालाल चौधरी , हर्षल पाटील , नरेन्द्र नारखेडे , पुरूजीत चौधरी ,यांनी आपले विचार मांडले .बैठकीस भरतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव ,

भाजपा युवा मोर्चाचे सागर कोळी , माजी पंचायत समिती उपसभापती दिपक अण्णा पाटील , सरपंच अजय भालेराव , फैजपुरचे माजी नगराध्यक्ष निलेश (पिंदू ) राणे , भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे , देवीदास धांगो पाटील ,शिवसेना शिंदे गटाचे तुषार मुन्नाभाऊ पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे , व्यकंटेश बारी परिष नाईक व पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

बैठकीचे सुत्रसंचालन व आभार भाजपाचे तालुका सराचिटणीस विलास चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Yaval krushi

Previous articleयावल भुसावल मार्गावर मोटरसायकल चालवितांना अचानक हृदयविकाराचा झटका दुचाकी कोसळुन एक ठार तर दोन जख्मी
Next articleगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने मध्ये सुधारणा करून यापुढे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून राबविण्यात येणार