Home बुलढाणा सिद्धरामैय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाचा धनगर समाजाकडून जल्लोष

सिद्धरामैय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाचा धनगर समाजाकडून जल्लोष

197

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव : कर्नाटक राज्यात काँग्रेसने धनगर समाजाचे सिद्धरामैय्या यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री केल्याने धनगर समाजाच्या वतीने शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत २० मे रोजी जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पन करून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने चौक दणाणला होता. कर्नाटक येथे २० मे रोजी शपथविधी पार पडला यामध्ये धनगर समाजाचे देशातील एकमेव मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

त्यामुळे सर्वत्र आनंदाची लहर उठली असून समाजच्या वतीने जल्लोष करण्यात आला आहे.

यावेळी निलेश घोंगे, गजानन गुरव, पत्रकार अमर बोरसे, सुरेश फासे, संतोष दिवनाले, सागर घुले, किशोर जुमळे, सुधाकर गुरव, संजय जानकर, राहुल करे, विवेक बोरसे, विनायक घुले, आकाश डांगे, आकाश सुरोसे, सचिन नागे, वैभव उभे, आशुतोष घुले, ओम घुले, उमेश घुले, चेतन बोरसे, भारसाकळे, गजानन भिवटे विशाल गाडगे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.@cmomaharashtra #cmomaharashtra #devendrafadnvis #eknathshinde @eknathshinde

Previous articleगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने मध्ये सुधारणा करून यापुढे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून राबविण्यात येणार
Next articleमाजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांनी शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला