Home Breaking News खामगाव जवळील वाडी येथे संन्मती मुलांच्या वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याकडे मिळाला देशी कट्टा...

खामगाव जवळील वाडी येथे संन्मती मुलांच्या वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याकडे मिळाला देशी कट्टा व जिवंत काडतूस

152

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

खामगाव शहराला लागूनच असलेल्या खामगाव जलंब मार्गावरील वाडी या गावात वस्तीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याकडे अवैधरित्या देशी कट्टा अग्निशस्त्र व जिवंत काडतूस मिळाल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत खामगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 मे रविवारी खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील हे पोलीस स्टेशनला हजर असताना

त्यांना गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली की वाडी येथील संन्मती मुलांच्या वस्तीगृहामध्ये राहात असलेल्या एका मुलाकडे देशी कट्टा व जिवंत काडतूस आहे सदर माहिती मिळताच व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे यांना बोलावून त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली

व तपास सकाळचे अमलदार यांच्यासोबत कारवाई करण्याबाबत आदेशित केले पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे सहायक फौजदार मोहन करुटले पोलीस कॉन्स्टेबल अमरदीप ठाकूर गणेश कोल्हे अंकुश गुरुदेव विष्णू चव्हाण यांनी वाडी येथे संमती वस्तीगृहात धाव घेतली. वस्तीगृहामध्ये रूम नंबर 204 मध्ये नितीन राजीव भगत वय 22 वर्षे राहणार आंबेटाकळी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा याची झेडपी घेतली व

रूमची पंच समक्ष झडती घेतली असता झडतीमध्ये लोखंडी पलंगाच्या खाली काळ्यारंगाची बॅग संशयास्पद दिसली. सदर बॅग चेक केली असता पिस्टल च्या आकाराचा एक देशी कट्टा ज्याचे बेरल लोखंडी असून मुठे ला दोन्ही बाजूने लाकडी पट्टी असून त्याला मॅक्झिन लावलेली तसेच पाच नग जिवंत काडतूस त्यापैकी एका जिवंत काडतूूसच्या पाठीमागे भागावर अंग्रेजी के एफ -7.65 असे कोरलेले किंमत दहा हजार रुपये मिळून आला.

या संबंधात विचारपूस केली असता नितीन राजू भगत व 21 वर्षे या मुलाने उडवावी ची उत्तरे दिली त्यामुळे सदर शस्त्र जप्त करून अवैधरित्या देशी कट्टा व पाच नग जिवंत काढतोस बाळगले प्रकरणी त्याची एक कृत्य कलम 3,25 शस्त्र अधिनियम अन्वये होत असल्याने त्याच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम 3,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे

आरोपीला अटक करण्यात आली असून याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे करीत आहेत

Previous article26 मे रोजी श्री गणेश प्रस्त मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय शासन आपल्या दारी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
Next article26 मे रोजी श्री पांडुरंग कृपा कुणबी समाज भवन येथे तालुकास्तरीय शासन आपल्या दारी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे