यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे
भरारी पथकामार्फत कृषी केंद्रांची तपासणी
खरीप हंगामां पूर्वी यावल तालुक्यातील कृषी केंद्रांचे भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात आली त्यामध्ये ज्या कृषी केंद्रांचे तपासणीमध्ये कमतरता आढळून आले त्यांना नोटीस बाजावण्यात आलेल्या आहेत.
बोंड आळीचा प्रादुर्भाव टळण्यासाठी कापसाचे बियाणे एक जून नंतर विकण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
स्वदेशी 5 या वाणाची उपलब्धता या वर्षासाठी कंपनीमार्फत करण्यात येणार नसल्याने शेतकऱ्यांनी या वाणाची खरेदी करू नये व या बियाण्याची कुठे विक्री होत असल्यास कृषी विभागास संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी पी आर कोळी यांनी केले आहे.
रासायनिक खतांचा मुबलक पुरवठा शेतकऱ्यांना तालुक्यात असणार आहे त्यामुळे आवश्यक तेव्हढे रासायनिक खतांची खरेदी शेतकऱ्यांनी करावी. अधिक दरात विक्री होत असल्यास कृषी विभागास संपर्क करावा.
धिरज हिवराळे कृषी अधिकारी पंचायत समिती यावल