Home Breaking News दुसऱ्या विवाहीत पुरुषा बरोबर राहण्याचा तिचा हट्ट त्या अज्ञात महिलेच्या अंगलठ आला...

दुसऱ्या विवाहीत पुरुषा बरोबर राहण्याचा तिचा हट्ट त्या अज्ञात महिलेच्या अंगलठ आला व तिचा खुन झाला हिंगोणा येथील घटना संशयित आरोपीस अटक

471

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील हिंगोणा या गावाजवळच्या मोर धरण परिसरात राहणाऱ्या एका संशयीत व्यक्तिने महीलेच्या गळ्यावर ब्लेडने वार करून नंतर तिला विहीरीत ढकलुन दिल्याने तिचा मृत्यु झाल्यावे याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

असुन, संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , एक४०वर्षीय महिला या घटनेतील संशयीत आरोपी खुमसिंग सरदार बारेला वय३३ वर्ष मुळ राहणार खिरवड तालुका रावेर हल्ली मुकाम मोर धरणाजवळ हिंगोणा तालुका यावल याचे कडे आलेल्या ४०वर्षीय अज्ञात महिला संशयीताच्या घरी आली

व त्याच्या घरात राहण्याचा हट्ट केला , मात्र संशयीतने सदर महिलेस सांगीतले की तुझ्यामुळे माझा संसार खराब होइल असे तिला वारंवार बोलुन समजवण्याचा प्रयत्न केला मात्र सदरची महीला ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने संशयीत आरोपी सुमसिंग सरदार बारेला यांने संतापाच्या भरात त्याच्याकडील असलेल्या ब्लेडने सदर त्या अज्ञात महिलेच्या गळ्यावर केले व नंतर तिला विहीरीत ढकलुन त्याच्या मृत्युस कारणीभुत ठरला

असुन, याबाबत संशयीत आरोपीच्या विरूद्ध फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत असुन , या गुन्ह्यातील संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या घटनेतील खुन झालेल्या अज्ञात ४० वर्षीय महीलेची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नसल्याचे वृत्त आहे .

Previous articleयावलच्या आदीवासी प्रकल्प विकास कार्यालयातील लेखापाल२० हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने पकडले
Next articleशेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या फरारी व्यापाऱ्याचा तत्काळ शोध घेण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे