Home Breaking News यावल शहरात मॉलमध्ये काम करणाऱ्या तरूणीचा एकाने केला विनयभंग तरूणीच्या तक्रारी वरून...

यावल शहरात मॉलमध्ये काम करणाऱ्या तरूणीचा एकाने केला विनयभंग तरूणीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल

341

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शहरातील प्रसिद्ध मॉल मध्ये काम करणाऱ्या एका तरूणीचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन ,याबाबत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी , यावल शहरातील भुसावळ मार्गावरील मुख्य चौकात असलेल्या एका मॉल मध्ये दिनांक २८ मे रोजी १९ , ३० वाजेच्या सुमारास कॅश काउंटर कामास असलेल्या एका १९वर्षीय तरुणीची ईक्रामोद्दीन अल्लाउद्दीन शेख ,राहणार आयशानगर यावल या तरुणाने तरूणी काम करीत असलेल्या मॉल मध्ये सामान घेण्याच्या बहाण्याने येवुन तरुणीच्या जवळ आला

असता तु मला आवडते ,तु माझ्याशी लग्न करणार का व तु माझ्या घरी ये आपण मजा करू असे बोलुन तरूणीस लज्जा वाटेल असे कृत करून तिचा विनयभंग केला .

यावल पोलीस ठाण्यात त्या तरुणीने फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्यातील संशयीतास पोलिसांनी अटक केले असुन, पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेंबल संजय देवरे हे करीत आहे .

दरम्यान घटनेचे वृत्त कळताच नागरीकांची मोठी गर्दी रात्रीच्या वेळेस या मॉल समोर झाली होती .

Previous articleयावल शहरात ओसरीत झोपलेल्या एका विवाहीत महिलाचा साडी ओढुन विनयभंग महीलेच्या तकारी वरून आरोपी अटक
Next articleसुप्रसिद्ध धार्मिक टीव्ही चॅनेल चे प्रसिद्ध भजन सम्राट डॉ. इंद्रजीत छांगाणी यांच्या मधुर आवाजात भजन संध्या कार्यक्रम