Home बुलढाणा सुप्रसिद्ध धार्मिक टीव्ही चॅनेल चे प्रसिद्ध भजन सम्राट डॉ. इंद्रजीत छांगाणी यांच्या...

सुप्रसिद्ध धार्मिक टीव्ही चॅनेल चे प्रसिद्ध भजन सम्राट डॉ. इंद्रजीत छांगाणी यांच्या मधुर आवाजात भजन संध्या कार्यक्रम

116

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: माहेश्वरी भवन येथे संगीत सम्राट वाणीभूषण संस्कार व आस्था टीव्ही चॅनेल चे विश्व प्रसिद्ध भजन सम्राट डॉक्टर इंद्रजीत छांगाणी सूर्यनगरी जोधपुर राजस्थान यांच्या मधुर वाणी मध्ये एक जून रोजी रात्री भजन संध्या चे आयोजन करण्यात आले होते

पुष्करणा ब्राह्मण समाज खामगाव तथा तुलसी भजन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भजन संध्या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर इंद्रजीत छांंगाणी यांच्या द्वारे श्री गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या भजन संध्या मध्ये राजस्थान राज्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र रामदेवरा येथील रामदेव बाबांचे प्रसिद्ध भजन रूणीचे रा राजा अजमालजी रा कवरा.

सोबतच नाथद्वारा येथील ठाकुरजींचे व श्याम बाबांचे भजन गाऊन संपूर्ण वातावरण भक्तीमय बनविले होते या भजन संध्या कार्यक्रमांमध्ये चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा याबरोबरच,सबकुछ मिल जाता है लेकिन मा नही मिलती हे भजन सादर करण्यात आले यावेळी उपस्थित अनेक भाविकांना आपले अश्रू आवरता आले

नाही या संगीतमय भजना संध्या कार्यक्रमांमध्ये राजस्थान राज्यातील सूर्यनगरी येथील भजन सम्राट पंडित जुगल जी छांगाणी यांच्यासह त्यांचे तबलावादक व इतरांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमांमध्ये जैसलमेर राजस्थान येथील चार वर्षीय बाल भजन गायक रोशन ओझा, हैदराबाद येथील दहा वर्षीय कुमारी सानवी छांगाणी यांनी आपल्या मधुर आवाजात एका पेक्षा एक भजन सादर करून उपस्थितांची मने जिंकली भजन संध्या कार्यक्रमांमध्ये, मुंबई ठाणे येथील विजय जोशी इत्यादी भजन गायकांनी सुद्धा आपल्या मधुर आवाजात भजन सादर केले

जवळपास चार ते पाच तास चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झालेले दिसत होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ललित कुमार रमेशचंद्रजी छांगाणी ,सौ कांता शशिकांत जोशी जैसलमेर राजस्थान, सौ राजश्री राजकुमार व्यास सौ कृष्णा सतीश व्यास अहमदाबाद गुजरात पुष्करणा ब्राह्मण समाजाचे प्रतिष्ठित जुगलजी छांगानी, ओमप्रकाश जी छांगानी सत्यनारायण छांगाणी राजकुमार व्यास मालती देवी व्यास सौ अर्चना उर्फ चिंटू चांडा ,मोहित व्यास अनमोल जोशी चेतन बोहरा संजय जोशी गोपाल छांगाणी दिलीप छांगाणी यांच्यासह पुष्करणा ब्राह्मण समाजातील इतरांनी परिश्रम घेतले

Previous articleयावल शहरात मॉलमध्ये काम करणाऱ्या तरूणीचा एकाने केला विनयभंग तरूणीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल
Next articleजळगाव जामोद जा. व संग्रामपूर /सोनाळा” येथील अवैद्य धंदे तात्काळ बंद”करावे:- आझाद हिंदी ची मागणी