विकी वानखेडे यावल
जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ च्या अध्यक्षपदी महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरणगावचे गोपाळ निवृत्ती पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
तसेच उपाध्यक्षपदी मुक्ताईनगरचे राजु बाबूलाल लवांडे यांचीही निवड बिनविरोध झाली.
सहा तालुका कार्यक्षेत्र असलेल्या भुसावळ पतपेढीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली.यात सचिवपदी रावेरचे विनोद विश्वनाथ तसेच खजिनदारपदी यावलचे प्रशांत सुरेश सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
दरम्यान टिडीएफ प्रणित समविचारी संघटनांच्या सहकार पॅनलचे १३ सदस्य या पतपेढी निवडून आले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव जिल्हा माध्यमिक संघ,जळगाव जिल्हा कलाध्यापक संघ,टिडीएफ व समविचारी संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.निवडीनंतर पतपेढीच्या आवारात ढोलताशे वाजवून,फटाके फोडून,गुलाल उधळून विजय उत्सव साजरा केला.
यावेळी जळगाव पतपेढीचे अध्यक्ष व सर्व विद्यमान व माजी संचालक तसेच मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर वृंद हजर होते.पदाधिकारी निवड प्रक्रिया उपनिंबधक एस.डी.उचित व मनोज चौधरी यांनी पार पाडली नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक यांचा सत्कार करून आनंद उत्सव साजरा करून उत्साहात निवड प्रक्रिया पार पडली.
विजयानंतर अध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकारी