Home Breaking News नवनियुक्त तहसीलदार मोहनमाला नाझिरकर तहसीलदारपदाचा चार्ज घेण्याआधीच अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या...

नवनियुक्त तहसीलदार मोहनमाला नाझिरकर तहसीलदारपदाचा चार्ज घेण्याआधीच अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना दणका

559

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तहसीलदारपदाचा चार्ज घेण्याआधीच अवैध गौण खनिज वाहतूकदारांना नवनियुक्त तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांचा दणका

यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आज सोमवार दि.५ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सकाळी भुसावळहुन यावल येथील यावल तहसील कार्यालयात आपल्या तहसील पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी येत असताना अंजाळे गावाजवळ अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर पकडल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये तसेच संपूर्ण महसूल यंत्रणे मध्ये मोठी खळबळ उडाली.

प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना त्या म्हणाल्या की भर दिवसा अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याचे कारवाई करण्यात आली यापुढे सुद्धा अवैध गौण खनिज व अवैध व चुकीची कामे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे यावल तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारताना तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी सांगितले.

Previous articleतेरवी कार्यक्रमाला तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती
Next articleशेगाव येथील रेल्वे स्टेशन वर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना तर्फे शेगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक तीन येथे ओडिसा येथील बालासोर मध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली