Home Breaking News खामगाव नांदुरा रोडवर अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्या व विकत घेणाऱ्यास उपविभागीय पोलीस...

खामगाव नांदुरा रोडवर अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्या व विकत घेणाऱ्यास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने छापा मारून पकडले.

200

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

खामगाव नांदुराम मार्गावर पोलीस उप अधिकारी यांच्या पथकाने छापा मारून अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्या दोघांना अटक केलीयावेळी मोठ्या प्रमाणावर बायोडिझेल ट्रकसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार

खामगाव शहरालगत सायंकाळी सजनपुरी परिसरातील – सजनपुरी भागात महामार्गावर महामार्गावर एका ठिकाणी अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत असल्याची माहिती उपविभागी पोलिस अधिकारी यांना मिळाली गुप्त व खात्रीशीर मिळालेल्या या

माहितीवरून पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या पथकासह उपरोक्त ठिकाणी छापा मारून बायोडिझेलची विक्री करणाऱ्या व विकत घेणाऱ्यां अशा दोघांना विनोद ठाकरे व त्यांच्या पथकातील पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी पुरवठा विभागाचे ही अधिकारी उपस्थित होते पोलिसांनी रशीद खान लियाकत खान (४०) रा. कॉलनी शेख करीम शेख लुकमान

बागवान (२७) रा. चिखली या दोघांना तब्येत घेतले यावेळी आरोपी हा ट्रक क्र. एमएच ३० काल एबी-३८३३ मध्ये अवैधपणे

बायोडिझेल भरत होता.

यावेळी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्या जवळून २००० लिटर बायोडिझेल, एक टाटा वाहन, टाक्या मशीन, पाईप जनरेटर, ट्रक असा एकुण २१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुरवठा विभाग बायोडिझेल तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली

Previous articleशाहिरांच्या विररस, स्फूर्ती गितांनी शिवप्रेमी श्रोते मंत्रमुग्ध.शिवराज्याभिषेक सोहळा दिन उत्साहात साजरा.
Next articleखामगाव येथून जलंंब करिता पहाटे सुटणाऱ्या रेल्वेची वेळ बदला- माधुरी शर्मा राष्ट्रीय अध्यक्ष रेल्वे महिला प्रवासी संघटना