Home बुलढाणा विद्यार्थ्यांसाठी पास, वितरण कार्यालय बंद” असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजगी..

विद्यार्थ्यांसाठी पास, वितरण कार्यालय बंद” असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजगी..

113

 

वरवट बकाल येथील पास वितरण कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्याची गरज.

संग्रामपूर तालुक्यातील असलेले मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल येथील दिनांक 26 एप्रिल 2023 पासून जळगाव जामोद अंतर्गत येणारे पास वितरण कार्यालय’ सलगपणे बंद” आहे
सदर ठिकाण हे महत्त्वाचे असून वरवट बकाल गावाला अंदाजे 70 ते 80 गाव जोडलेले असून सदर ठिकाणी महाविद्यालय व कॉलेज आणि प्राथमिक शाळा सुद्धा असून पासेस काढन्या साठी येणाऱ्या विध्यार्थी संख्या ही हजारोंच्या घरात आहे.

वरवट बकाल येथून एकलारा,बावनबीर,टूनकी,सोनाळा पातुर्डा, वानखेड, खीरोळा, मनारडी, काथरगाव, काटेल कोलद, काकण वाडा, शेगाव व जळगाव व संग्रामपूर करिता विद्यार्थी ये जा करतात
सदर पास वितरण कार्यालय बंद असल्यामुळे विध्यार्थी यांना जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागत असून त्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे.

सदर कार्यालय त्वरीत सुरू करण्यात यावे अशी विध्यार्थी व पालकांची मागणी आहे
अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास संबधित अधिकारी जबाबदार राहतील
विध्यार्थी यांच्या होणाऱ्या शैक्षणिक व आर्थिक त्रास यास महामंडळ चे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

 

विशेष आगर प्रमुख जळगाव जामोद यांना मागील 10 /4/ 2023 रोजी प्राचार्य अंकिता कम्प्युटर टायपिंग रजिस्टर नंबर 62 127 वरवट बकाल जळगाव जामोद आगर यांना निवेदन दिले होते असिस्टंट निवेदन मध्ये नमूद होती की वरवट बकाल येथील पाच विभाग चालू ठेवणे बाबत या मध्यस्थी ठिकाणचे पास ऑफिस विभाग बंद ठेवले

तर विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान झाल्यास किंवा शिक्षण पासून वंचित राहिल्यास त्याला आपण जबाबदार असाल आणि अंकिता कम्प्युटर टायपिंग ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या 150 ते 200 पर्यंत आहे वरवट बकालीतील पास काढण्याचे ऑफिस बंद असल्यामुळे विद्यार्थी आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असून वरवट बकाल येथील एसटी पास विभाग चालू ठेवावे ही नम्र विनंती सुद्धा मागील 10 4 2023 ला केली होती परंतु याच्यावर कोणतीच लक्ष न देता जळगाव जामोद आगार चे संबंधित अधिकारी यांनी लवकरात लवकर वरवट बकाल चौकामधील एसटी पास ऑफिस चालू करण्यात यावे

 

 

मासिक पास योजना
सदर योजने अंतर्गत २० दिवसांचे परतीचे प्रवासभाडे आकारणी करुन एक महिना ३० दिवसांचे कालावधीचा परतीचा पास देण्यात येतो़ या योजनेच्या अंटी,शर्तीया त्रैमासिक पास योजनेप्रमाणेच अंसुन या योजनेअंतर्गत प्रवाशांना सुमारे ३३. ३३% प्रवास भाडे सवलतीचा लाभ होतो़ सदर योजने अंतर्गत पास प्राप्त करण्याची पध्दतीसुध्दा त्रैमासिक पास योजने प्रमाणेच आहे़ तथापि,या योजनेअंतर्गत पास धारकांस ज्या सेवेचा पास अंसेल त्या सेवेद्वारे प्रवास अंनुज्ञेय आहे़*

Previous articleधुळेपाडा आदीवासी वस्तीवर पिण्याचे पाणी मिळावे यासाठी निळे निशाण सामाजिक संघटनेचे यावल येथे आंदोलन
Next articleभाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते आलापल्ली येथे विकास कामांचे भूमिपूजन