Home Breaking News विहिगाव -खेट्री येथील दोन दुचाकींची समोरासमोर धडक?

विहिगाव -खेट्री येथील दोन दुचाकींची समोरासमोर धडक?

108

 

▪️विहीगाव- अटाळी रस्त्यावरील अपघात घटना
▪️एक जागीच ठार दुसरा गंभीर जखमी

राहेर:-पातुर तालुक्यातील खेट्री येथील दुचाकी विहीगाव अटाळी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना खामगांव तालुक्यातील विहीगाव येथे रविवार दि. 11 जून रोजीच्या दुपारच्या सुमारास घडली.

यात विजय शेगावकर वय 58 वर्ष रा.विहीगाव ता.खामगाव असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.खेट्री येथील अमोल एकनाथ लांडे वय 35 हे गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

खेट्री येथील योगेश महादेव ताले व अमोल एकनाथ लांडे हे दोघेजण दुचाकीवर खामगांव कडे जात होते तर खामगांव तालुक्यातील विहीगाव येथील दुचाकीस्वार खामगांव हून विहिगाव कडे जात असताना दरम्यान दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात विहीगाव येथील विजय शेगावकर हे जागीच ठार झाले.

अमोल एकनाथ लांडे हे गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी अकोला हलविले आहे.प्रतिनिधी गणेश भाकरे मोरगांव भाकरे

Previous articleसामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांच्या प्रयत्नाने हिंगणघाट शहरातील ३१ अंगणवाडी पोहोचले विद्युत मीटर
Next articleकारवाई शुन्य नगर पालीकेच्या विरोधात पुन्हा जनआक्रोश