Home वर्धा विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने प्रा. डॉ. शरद विहीरकर यांच्या सत्कार

विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने प्रा. डॉ. शरद विहीरकर यांच्या सत्कार

128

 

 

प्रमोद जुमडे हिंगणघाट

हिंगणघाट प्रमोद जुमडे: विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने रघुनाथ शेंडे यांच्या नेतृत्वात प्रा.डॉ. रमेश पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनटक्के यांचे नियोजनामध्ये 6 जून ते 11 जून या कालावधीत संवाद यात्रा नागपूर वरून निघाली विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा ,यवतमाळ अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातून संवाद साधत शेवटी नागपूर येथील नेहरू महाविद्यालय सक्कदरा चौक करण्यात आला

समारोपीय कार्यक्रमाला रघुनाथ शेंडे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. श्रीरामजी कावळे प्र – कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. प्राचार्य सुनील साखरे गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ.सतीश चाफले महामंत्री शिक्षक मंच ,नागपूर तसेच प्रा. डॉ.नामदेव हटवार सरचिटणीस विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. शरद विहीरकर यांचा सत्कार करण्यात आला

हिंगणघाट परिसरामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभाग घेणारे प्रा. डॉ शरद विहीरकर हे रा. सू. बिडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, हिंगणघाट येथे इंग्रजी विभागामध्ये कार्यरत असून आयक्युएसी समन्वयक आहे यांचे संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरणावर निवड झाल्याबद्दल यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

याप्रसंगी नागपूर विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक आणि समाज बांधव उपस्थित होते .

Previous articleयावल चोपडा मार्गावर एसटी बस व मोटरसायकलचा भिषण अपघात एक जण ठार तर तिन जण गंभीर जख्मी
Next articleनिर्मला तायडे यांना विश्वसुंदरी शुभांगी शिब्रे मॅडमच्या हस्ते आदर्श समाज रत्न पुरस्कार प्रदान