इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
दिनांक 13/06/2023 रोजी रात्री 09/00 वा. सुमारास आरोपी विठ्ठल भालचंद्र सानप वय 52 वर्ष राहणार प्लॉट नंबर 72 राजीव गांधी नगर सिडको छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद याने शेगांव येथील नक्षत्र ज्वेलर्स शेगावचे सराफा व्यवसाका कडून सोन्याचे पेंडल खरेदी केले व गहूमनी खरेदी करायचे आहे असे म्हणाला. त्यानंतर सोन्याचे 46 गहू मनीचे वजन घ्यायचे आहे
असे सराफा व्यावसायिकाला म्हणाला, मोड म्हणून आपल्या जवळील काही दागिने त्यांना दिली परंतु सदर दागिने नकली असल्याचे सराफा व्यावसायिकाचे लक्षात आल्यामुळे त्यांना सदर व्यक्ती बद्दल संशय आला नक्षत्र ज्वेलर्स चे संचालक निलेश गणोरकर यांनी याबाबत शेगांव शहर पोलिसांना माहिती दिली.
सदर माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील हे आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यासह जाऊन त्यांनी आरोपीला पकडून त्याचेंजवळून नगदी 88,080/- रु. व काही पांढऱ्या व पिवळ्या धातूचे वस्तू दागिने व बनावट चांदी चे दागींने ईतर साहित्य जप्त करून ताब्यात घेतले
याबाबत सराफा व्यावसायिक निलेश शांताराम गणोरकर यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून अपराध क्र. 328 /23 कलम 420,511 भा.द.वी. चा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास पो. उप. नि. आशिष गंद्रे करीत आहे.
या आरोपी ची छत्रपती संभाजी नगर बीड व जालना यथे गुन्हेगारी पूर्वपार्श्वभूमी असल्याची माहिती मिळाली असून त्याला पकडल्याने सराफा व्यवसायिकांचे फसवणुकीचे बरेच गुन्ह्याची उकल होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे.