Home अकोला श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात कार्यशाची सांगता

श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात कार्यशाची सांगता

74

 

पातुर प्रतिनिधी श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात
तीन दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यपीठांतर्गत विद्यार्थि कल्याण विभाग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना विभाग श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिर्ला अंधारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय सॉफ्ट स्किल्स कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

समारोप सोहळ्यात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री नारायण भाऊ अंधारे हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थित रूबिक्योन स्किल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड पुणे. चे प्रशिक्षक म्हणून कु कोमल नागरे छत्रपती संभाजीनगर येथून व अमेय गर्गवा इंदोर येथील दोन प्रशिक्षक, तसेच अनता अंधारे, प्राचार्य डॉ. राम खरडे , रा. से. यो कार्यक्रम अधिकारी शैलेश दवणे हे उपस्थित होते.

या वेळी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी धनश्री बुळबुले, सुमित खंदारे, संचित काळपांडे, गायत्री डहाके, नचिकेत देशपांडे, श्रद्धा मुंढे, संकेत कदम, अश्विनी पांडव,नेहा अंबुसकर, गौरव गावंडे, सहील ननावरे, नारायणी चौढरी, यांनी आपली तीन दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन झाले त्याचे बदल आपले मनोगत व्यक्त केले.

या समारोह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी धोटे हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा. सागर भगत यांनी केले.या कार्यक्रमाला आयोजन करण्यात साठी विद्यार्थि कल्याण अधिकारी डॉ संदीप हाडोळे, कृषि महाविद्यालय चे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्णाभाऊ अंधारे, विद्यापीठ कार्यकारणी सदस्य सौ.हेमलताताई अंधारे, प्राचार्य डॉ राम खरडे यांच्या मार्गद्शनाखाली करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि प्रा. शैलेश दवणे, प्रा सागर भगत, प्रा पांडुरंग जाधव, प्रा शिवकुमार राठोड, प्रा रोहित कानोजे, प्रा संजय गायकवाड, प्रा भाग्यश्री राऊत, प्रा सोनल खवने. प्रा आरती पंचभुधे, सौरभ वर्मा, पंकज देशमुख ओम जाधव, राधेश्याम दाखोर यांनी मेहनत घेतली.

Previous articleशेगाव पोलिसांनी वृद्ध महिलेस हरविलेले सोन्याचे मंगलसूत्र सोने ची पोत 2 तोले 1,20,000 रूचि परत मिळवून दिले 
Next articleशेगाव शहर पोलिसांद्वारे दारूबंदी संबंधाने झाडाझडतीमध्ये दोन गुन्हेगारांवर कार्यवाही करण्यात आली.