Home Breaking News किनगाव गावातुन ११ वर्षीय मुलास अज्ञात व्यक्तिने काहीतरी कारणासाठी फुस लावुन पळविले...

किनगाव गावातुन ११ वर्षीय मुलास अज्ञात व्यक्तिने काहीतरी कारणासाठी फुस लावुन पळविले पोलीस गुन्हा दाखल

549

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथील अकरा वर्षाच्या मुलाला कुणीतरी अज्ञात व्यक्तिने पळवुन नेल्याची घटना घडली असुन , या घटनेमुळे परिसरातील पाल्यांच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे . मुलाच्या आईने फिर्याद दिल्याने पोलीसात त्या अज्ञात व्याक्ती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, नुर मोहम्मद साबीर खान , वय ११ वर्ष११ महीने राहणार गौशिया नगर किनगाव तालुका यावल या मुलास दिनांक १७ जुन रोजी दुपारी ४,३oवाजेच्या सुमारास राहत्या घरातुन कुणीतरी अज्ञात व्यक्तिने काहीतरी अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेले आहे .

दरम्यान १५ जुन पासुन सर्वत्र शाळा सुरू झाल्या असुन , शाळेत जाण्यासाठी मुलांची वर्दळ असते अशा वेळेस या मुलास अज्ञात व्यक्तिने पळवुन नेल्याची घटना घडल्यामुळे परिसरात विद्यार्थी पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेते विषयी एकच भिती व चिंता व्यक्त करण्यात येत आहे .

या घटने बाबत नुर मोहम्मद खान या मुलाची आई सईदाबी साबीर खान वय३३ वर्ष या यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ति विरूद्ध फिर्याद दाखल केल्याने भादवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक सुनिल मोरे

Previous articleविदर्भाची प्रति पंढरी शेगाव ते देशाची पंढरी पंढरपूर अशी सरळ रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी याकरिता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत आपण लवकरच भेट घेणार असलेल्या ची माहिती .खासदार प्रतापराव जाधव
Next articleयावल आगारातील रात्रीची भुसावळ बससेवा सुरू करावी व पुणे रातराणीच्या बस सेवेच्या वेळेत बदल करावी : शिवसेना उबाठा व प्रवाशी संघटनेची मागणी