Home बुलढाणा कृषी केंद्र संचालकां सोबत शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

कृषी केंद्र संचालकां सोबत शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

172

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक २०जून रोजी ११.०० वा. पो. स्टे. शेगांव शहर येथे परी पोलीस उपअधिक्षक विवेक पाटील व ठाणेदार पोनी . विलास पाटील यांचेद्वारे शेगांव तालुक्यातील कृषी केंद्र संचालक यांची मिटिंग आयोजीत करण्यात आली होती.

सदर मिटींगमध्ये सद्यस्थीतीत जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या बोगस व भेसळयुक्त बि बीयान्यांचे विक्री व वितरणाबाबत मिटींगमध्ये चर्चासत्र राबविण्यात आले.

शेतकरी हिताच्या दृष्टीने बीयान्यांची जास्त दराने विक्री करु नये, दुकानांमध्ये बोगस बी बीयान्यांचा वापर करू नये. आपले दुकानात कोणती खते, बि बयाने आहेत याची अद्यावत माहीती रजीस्टरला नोंदी ठेऊन दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या व स्वतः दुकानाच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून दुकानामध्ये कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही अथवा अनुचीत प्रकार घडणार नाही

या करीता दुकानामध्ये C.c.t.v. लावणेबाबत सूचना दिल्या. सदर मिटींग मध्ये शेगांव तालुक्यातील एकुन २० कृषी केंद्र व्यवसायीक उपस्थीत होते.

Previous articleसुलतानपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फलकाचे अनावरण व पक्ष प्रवेश
Next articleशेगाव शहर पोलिसांनी केला योगा दिवस साजरा