Home बुलढाणा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका येथून हरविलेल्या इसमांचा शेगाव शहर पोलिसांनी लावला शोध....

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका येथून हरविलेल्या इसमांचा शेगाव शहर पोलिसांनी लावला शोध. पोलिसांच्या तत्परतेची शहरवासीयाकडून होत आहे कौतुक

184

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

पोलीस स्टेशन वसंत नगर, ता. पुसद जिल्हा यवतमाळ हद्दीतून हरविलेल्या 47 वर्षीय इसमाचा शेगाव शहर पोलिसांनी शेगाव शहरात शोध लावला याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात येणाऱ्या

पोलीस स्टेशन वसंत नगर हद्दीतून सुनिल राजहंस पाझरे वय ४७ वर्षे रा. पुसद हे दिनांक १६/०६/ २०२३ रोजी पुसद येथुन हरविले होते. त्याप्रकरणी पो.स्टे. वसंत नगर येथे मिसींग क्रमांक २१/२०२३ दिनांक १६/०३/२०२३ चे मिसींग प्रकरण दाखल करण्यात आले होते. सदर हरविलेले इसम हे शेगांव येथे असल्याची माहिती मिळताच परी.

पो.उप. अधिक्षक श्री. विवेक पाटील व पो.नि. विलास पाटील यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पो.स्टे. शेगांव शहर पोलीसांव्दारे विशेष शोध मोहीम राबवुन सदर मिसींग व्यक्तीचा १ तासाचे आत शोध लावला.

सदर शोध मोहीम मध्ये पो.ना./५०४ शेख इरफान यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. सदर मिसींग इसम यांचे नातेवाईकांना माहीती देऊन त्यांना त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सद्यस्थीतीत पो.स्टे. शेगांव शहरामध्ये परी. पो. उप अधिक्षक श्री. विवेक पाटील व पो.नि. विलास पाटील यांचेव्दारे पोलीस प्रशासनाचे कामकाजामध्ये दिसुन येत असलेल्या बदलाबाबत व पोलीसांचे कार्यतत्पतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleशेगाव शहर पोलिसांनी केला योगा दिवस साजरा
Next articleवारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा लाखो वारकऱ्यांना दिलासा