Home मुंबई वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा लाखो वारकऱ्यांना दिलासा

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा लाखो वारकऱ्यांना दिलासा

190

 

अर्जुन कराळे शेगाव

मुंबई दिनांक २१: पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.

यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरि जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करतांना सांगितले.

Previous articleयवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका येथून हरविलेल्या इसमांचा शेगाव शहर पोलिसांनी लावला शोध. पोलिसांच्या तत्परतेची शहरवासीयाकडून होत आहे कौतुक
Next articleरागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला शेगांव शहर पोलिसांनी दिले पालकांचे ताब्यात