Home Breaking News बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनमध्ये हिंदुत्ववादी संघटनां सोबत...

बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनमध्ये हिंदुत्ववादी संघटनां सोबत बैठक

288

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहर पोलीस स्टेशनयेथे
आज दिनांक 25.06.2023 रोजी पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील, पो. नि.विलास पाटील पो.स्टे.शेगांव शहर यांचे मार्गदर्शनाखाली आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सव संबंधात पो.स्टे.हद्दीतील हिंदू संघटनांची बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ईतर पदाधिकारी असे एकूण 12 महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी यांना आगामी सण उत्सव बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सव शांततेत पार पाडण्याबाबत तसेच सोशल मीडियाचा गैरवापर करू नये, कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड/पोस्ट करू नये, काही आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्यास आम्हास तात्काळ माहिती द्यावी असे मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या.

सदरची बैठक 18/30 वा. पासून 19/15 वा. पावेतो घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये बंदोबस्त काळात सार्वजनिक शांतता अबाधित राहावी याकरिता पोलिसांची शेगाव शहरातील मंदिर मज्जित व इतर समाजाची धार्मिक स्थळे, उपासना स्थाने, जातीय वस्ती यावर विशेष लक्ष केंद्रित केले.

गावातील विविध जाती-धर्माचे प्रतिष्ठित नागरिक व राजकीय पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन त्यांना बंदोबस्त काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Previous articleचुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या रस्त्याला मोहर्थ सापडेना: ग्रामस्थ झाले संतप्त
Next articleजीवनाला हो म्हणाअमली पदार्थाला नाही म्हणा