इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
आज दिनांक 27/06/2023 चे दुपारी 03:30 सुमारास शेगाव शहर पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी फैजलखान रोशन खान वय 26 वर्षे राहणार आझाद नगर तालुका शेगाव हा इसम गजानन महाराज मंदिर परिसरातील महाराजा गेस्ट हाऊस समोर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चोरीचा लॅपटॉप विकत देण्याचे प्रयत्न करीत होता.
अशा खात्रीलायक माहितीच्या आधारे शेगाव शहर पोलिसांनी नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याचे जवळ असलेल्या लिनोवो कंपनीच्या अंदाजे 40,000/-₹ किमतीच्या लॅपटॉप चे मालकी हक्काबाबत विचारणा केली परंतु त्याने उडवाउडीचे उत्तरे देऊन मालकी हक्काबाबत काही एक संयुक्तिक कारणे सांगितले नाही.
पोलिसांनी त्याला कसून चौकशी केली असता सदर लॅपटॉप हा चोरीचा असल्याचे त्यांनी कबुली दिल्याने आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन वाघमारे हे करीत आहे