Home बुलढाणा उघड्यावर मास विक्रेत्यांवर शेगाव शहरपोलीस स्टेशन पोलिसांनी केली कार्यवाही

उघड्यावर मास विक्रेत्यांवर शेगाव शहरपोलीस स्टेशन पोलिसांनी केली कार्यवाही

189

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक 27 जून 2023 रोजी आगामी एकादशी आषाढी व बकरी ईद सणानिमित्त पोलीस स्टेशन शेगाव शहरा अंतर्गत उघड्यावर मास विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दुपारी 01:30 वा. सुमारास

त्यांनी शेगाव शहरातील पेठ मोहल्ला येथे उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या लोकांवर छापा कार्यवाही करून मास विक्रेता शेख कालू शेख शेख इस्माईल वय पंचवीस वर्षे राहणार खळवाडी परिसर तालुका शेगाव याच जागेत पकडले व त्याच्यावर पोलीस स्टेशन शेगाव येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 105 अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.

तरी पेठ मोहल्ला व शेगाव शहरात इतरत्र उघड्यावर मास विक्री करणाऱ्यावर यापुढे सुद्धा कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना देऊन अवैधरीत्या किंवा उघड्यावर मास विक्री होणार नाही याकरिता मुस्लिम व इतर प्रतिष्ठित लोकांना पोलिसांचे संपर्कात राहून माहिती देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

Previous articleशेगाव शहर पोलिसांची भुरट्या चोरांवर करडी नजर
Next articleसमाजवादी जिल्हाप्रमुख यांनी डीवायएसपी यांच्याकडे कलम 169 अंतर्गत खोटे” गुन्हे खारीज करण्यासाठी दिले निवेदन