Home Breaking News समुद्रपुरात 6 लाख 12 हजाराची गावठी दारू जप्त

समुद्रपुरात 6 लाख 12 हजाराची गावठी दारू जप्त

131

 

प्रमोद जुमडे, समुद्रपूर, वर्धा

पोलीस स्टेशन समुद्रपुर परीसरात ईद व आषाढी सण बंदोबस्त दरम्यान पो.स्टे. समुद्रपुर डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे,श्रीकृश्ण इंगळे व 14 गृह रक्षक दलाच्या सैनिकांनी आज दि 28/06/2023 रोजी पो.स्टे. समुद्रपुर परीसरातील मौजा गणेशपुर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम राबविली असता, मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात जमिनीत गाढुन व झुडपात लपवुन असलेले एकुण 153 प्लास्टीक व लोखंडी ड्रममधील 10,950 लीटर गावठी मोहा दारूच्या निर्मिती करीता तयार करण्यात आलेला कच्चा मोहा सडवा रसायण, तीन पोत्यामध्ये अंदाजे 150 किलो गुळ व भट्टी साहित्य असा एकुण कि. 6,12,000 रू चा माल मिळुन आल्याने, संपुर्ण मुद्देमाल जप्त करून जागीचं नाश करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डाॅ. सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. संजय पवार सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रशांत काळे सा. यांचे निर्देशाप्रमाणे पो.अंम. अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे, श्रीकृष्ण इंगळे व 14 गृहरक्षक दलाच्या सैनिकांनी केली.

Previous articleबकरी ईद सणा निमित्त शेगाव शहर पोलिसांनी रहदरीच्या रोडने केला चोख बंदोब
Next articleशेगाव शहर पोलिसांनी केली अमली पदार्थ गांजाचे सेवन करणाऱ्या तीन गुन्हेगारांवर कारवाई