Home बुलढाणा हरविलेली मुलाचा घेतला शेगांव शहर पोलीसांनी शोध व दिले त्याला आई वडिलांचे...

हरविलेली मुलाचा घेतला शेगांव शहर पोलीसांनी शोध व दिले त्याला आई वडिलांचे ताब्यात.

99

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक २९/०६/२०२३ रोजी महत्त्वाच्या अशा आषाढी एकादशी निमित्त संत श्री गजानन महाराज येथे भाविक भक्तांची गर्दी उसळलेली आहे. त्यात भाविक भक्तांचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशन शेगाव शहर चे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील व परी पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील यांनी चोख बंदोबस्त नेमलेला आहे.

या बंदोबस्ताचे फलस्वरूप आज दर्शनाकरिता आलेले भाविक भक्त निलेश पस्तापुरे राहणार मालेगाव तालुका पातुर यांचा आठ वर्षाचा मुलगा श्लोक हा दर्शना दरम्यान लोकांच्या गर्दीमध्ये हरविला होता त्यांनी बंदोबस्त ला हजर असलेल्या पोलिसांना मुलाचा फोटो व माहिती देताच पोलिसांनी बंदोबस्त ला हजर असलेल्या सर्व अमलदारांना मोबाईल व्हाट्सअप द्वारे फोटो पाठवून लहान मुलगा श्लोक याचा शोध घेतला. शोध घेण्यासाठी सतत लाऊडस्पीकर वर अनाऊन्समेंट केली. हरवलेली मुलगा मिळाल्याने व्याकुळ झालेल्या आईचे आनंदाश्रु अनावर झाले.

तरी सद्यस्थीतीत मो.सा. चोरी, सोन्याचे पोथ, गळ्यातील दाग दागीने, पाकीट मारी, मोटार सायकल चोरी व लहान मुले मुली हरविण्याचे, पळविण्याचे प्रकार पाहता श्री. संत गजानन महाराज मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना आव्हाहन करण्यात येते की, दर्शनाकरीता येत असतांना आपले लहान मुला मुलींचा काळजीपुर्वक संभाळ करुन आपले दाग दागीने, पाकीट, पर्स, मोटार सायकल, मौल्यवान वस्तु चोरी किंवा लुट होणार नाही या दृष्टीने सुरक्षीततेबाबत खबरदारी घ्यावी, आपणासोबत अशी कुठलीही दुर्घटणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Previous articleबकरी ईद निमित्त परी पोलीस उपाधीक्षक श्री विवेक पाटील व पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील यांनी मुस्लिम समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन दिल्या हार्दिक शुभकामना.
Next articleकलेक्टरच्या समोर वाचला शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा….