Home बुलढाणा संत नगरी शेगाव मध्ये पंढरीच्या राजाचे आगमनाने आषाढी एकादशी उत्सव साजरा…!

संत नगरी शेगाव मध्ये पंढरीच्या राजाचे आगमनाने आषाढी एकादशी उत्सव साजरा…!

170
  • विठ्ठल अवताडे शेगांव

स्थानिक शेगाव मधील रोकडिया नगर ( पवन गिरी वसाहत) येथे स्थानिक नागरिक आणि श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा समितीच्या सहयोगाने नूतन श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री शिव लिंग प्राणप्रतिष्ठा मंदिर लोकार्पण सोहळा सोहळा पार पडला दिनांक २७-६-२०२३ रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री शिवलिंग यांच्या मूर्तीचे आगमन आणि शोभायात्रा पार पडली

तर दुसऱ्या दिवशी हवन पूजन स्थापना आणि कळस स्थापना पार पडली तर आज आषाढी एकादशीला सकाळी १० ते ११.३० पर्यंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ह भ प ज्ञानेश्वर महाराज मिरगे यांचे प्रवचन झाले त्यानंतर दानशूर व्यक्तींचा स्वागत सत्कार समारंभ आणि प्रसाद वाटप झाला तर सायंकाळी चार वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतीमे सह टाळ मृदंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली ,या

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तथा स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले तर भविकभक्तांसाठी आता पंढरीच्या राज्याचे दर्शन संत नगरीत घेण्याचा योग या निमित्ताने आला तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समिती मर्फक्त करण्यात आले .

Previous articleआषाढी एकादशी निमित्त शेगाव येथे लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन..
Next articleहरविलेल्या मुलीचा घेतला शेगांव शहर पोलीसांनी शोध व दिले तिला तीच्या पालकांचे ताब्यात.