Home वर्धा अजित पवारांच्या बंडा नंतर शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून प्रदेश सरचिटणीस अतुल...

अजित पवारांच्या बंडा नंतर शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात जिल्हयातील 100 पदाधिकारी वर्ध्याहून मुंबईला रवाना

61

 

प्रमोद जुमडे. हिंगणघाट/ वर्धा

वाय बी चव्हाण सेंटर मुंबई येथे शरद पवार यांच्या समर्थनार्थ उद्या होणार मुंबईत दाखल

अजित पवारांच्या बंडा नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे यादरम्यान वर्धा जिल्ह्यातून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात 100 पदाधिकाऱ्यांसह शरदचंद्र पवार यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून हे शेकडो कार्यकर्ते रवाना झाले आहे. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले हे देखील आपल्या शंभर पदाधिकाऱ्यांना घेऊन शरद पवार यांना समर्थन करण्यासाठी म्हणून मुंबई येथे वर्धाहून निघाले आहे…

अजित पवारांच्या बंडा नंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शरदचंद्र पवार यांना पाठिंबा दर्शवला होता.

व या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना घेऊन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले हे मुंबई येथे उद्या आयोजित केलेल्या वाय बी सेंटर येथील बैठकीस शरद चंद्र पवार यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून निघाले आहेत.

Previous articleसंत गाडगेबाबा चौकाजवळ विनापरवाना देशी दारू बाळगणाऱ्याला शहर पोलिसांनी घेतले ताब्यात गुन्हा दाखल
Next articleलालडोंगरी शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक-२ उत्साहात संपन्न.