Home वर्धा अत्यंत खराब झालेला तेलीपुरा चौक ते चेपे चौक रस्ता लवकरात लवकर दुरुस्त...

अत्यंत खराब झालेला तेलीपुरा चौक ते चेपे चौक रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा प्रभाग क्र.१० वासीयांची मुख्याधिकारी न.प. हिंगणघाट यांचेकडे मागणी

38

 

प्रमोद जुमडे. हिंगणघाट/ वर्धा

हिंगणघाट, येथील प्रभाग क्रमांक १०मधील जुनी वस्ती टिळक वार्ड, विठ्ठल मंदिर ,तेलीपुरा,वार्ड येथील प्रमुख रस्ता असलेल्या तेलीपुरा चौक ते चेपे चौक पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेमध्ये असल्याने त्या भागातील नागरिकांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्यामध्ये तर या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत असते. या भागातील लोकप्रतिनिधीना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार सुचना व विनंती करुनही आतापर्यंत आश्वासनापलिकडे काहीही मिळालेले नाही.

नगर परीषदेची अमृत योजना व नळ योजनेमुळे मागील पाच वर्षांपासून या रस्त्याची नुसती चाळण झालेली आहे.जागोजागी रस्ता फोडून ठेवलेला आहे.जागोजागी पाण्याचे डबके साचलेले आहे.परंतु अजुनही त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. या रस्त्यावर कितीतरी अपघात झालेले आहे.

शाळेकरी मुले, महिला मंडळी, बुजुर्ग मंडळी या रस्त्याने जाणेच शक्यच नाही.पायदळ तसेच दुचाकी वाहनाने सुध्दा या रस्त्याने जाता येत नाही आहे.

जुन्या वस्तीतील सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव, गौरीपुजन , नवरात्रोत्सव असो किंवा कुणाच्या घरीचे लग्न, वाढदिवस,बारसे, मय्यत ,तेरवी असो सर्वांना अडचणीचा सामना करीत, तारेवरची कसरत करीत हा रस्ता पार करावा लागतो.या रस्त्यावर कितीतरी अपघात होवून ब-याच जणांच्या हाता- पायांना इजा तर काहीजण कायमचे अपंग झालेले आहे.

म्हणून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात प्रभाग क्रमांक १० मध्ये राहणा-या रहिवाशांच्या वतीने मुख्याधिकारी नगरपालिका हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले व उपरोक्त रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी साहेबांच्या वतीने शिंदे साहेबांनी निवेदन स्वीकारले व संबंधित विभागाशी बोलुन लवकरात लवकर उपयोजना करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी निवेदन देतांना धनराज कुंभारे, नामदेव खानखुरे , उमेश डेकाटे, अशोक पवनीकर, संजय कावळे, राहुल बाकडे, अतुल चिंतलवार,अमित निमजे, गणेश कुंभारे, सुधीर मोहतेवार,साई रंभाडे,अक्षय कावळे, विशाल पराते, रोशन पाजनकर इत्यादी रहिवासी हजर होते.

Previous articleशरद पवारांना मानणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी हिंगणघाट विधानसभेत भरले प्रतिज्ञापत्र.प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी घेतला पुढाकार….
Next articleघर टॅक्स वाढीच्या निषेधार्थ सिंधी रेल्वेत नगर पालिका कार्यालयास राष्ट्रवादीचा नागरिकांसह घेराव.