Home बुलढाणा शेगाव पोलीस स्टेशन येथे ज्वेलर्स व बँक अधिकाऱ्या ची संयुक्त बैठक

शेगाव पोलीस स्टेशन येथे ज्वेलर्स व बँक अधिकाऱ्या ची संयुक्त बैठक

186

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव :आज दिनांक 14/07/2023 शेगांव शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील यांनी शेगाव शहर पो. स्टे. हद्दीतील बँक, पतसंस्था, A.T.M. व्यवस्थापक, सराफा व्यावसायिक, पत्रकार बांधव याची संयुक्त सभा आयोजित केली होती. यावेळी पो.नि. विलास पाटील यांनी उपस्थित

सर्वांना बँक, A.T.M. मध्ये प्रवेशच्या ठिकाणी, दर्शनी भागात व जेथे रोख व मौल्यवान मालमत्ता ठेवलेली आहे अशा ठिकाणी C.c.t.v. कॅमेरे लावून C.c.t.v. कॅमेराची नियमित काळजी घेणेबाबत सूचना दिल्या. रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक व आवश्यकतेप्रमाणे सशस्त्र गार्ड नेमने बाबत सूचना दिल्या. रात्रीच्या वेळी मालमत्तेच्या ठिकाणी,

बँकेच्या प्रवेशाच्या ठिकाणी दरवाजा, गेट, खिडकी येथे सायरन लावणेबाबत सूचना दिल्या. तसेच बँक , A.T.M. मध्ये चोरी होणार नाही या करिता आवश्यक ती दक्षता घेणेबाबत सूचना केली ,

A.T.M., सराफा व्यावसायिक परिसरामध्ये कुठलाही संशयित आढळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन ला माहिती देणेबाबत सूचना देऊन पो. स्टे. शेगांव येथील अधिकारी व अंमलदार यांचे फोन नंबर देण्यात आले.

Previous articleशिवसेना (ऊबाठा) द्वारे उपमुख्यमंत्री फडनवीस, बावनकुळे आणि नितेश राणे चा निषेध
Next articleशेगाव परिसराला ऑक्सिजन हब बनविण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेकडो वृक्ष लावणार- राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा