Home जळगाव एक रुपयात पिक विमा भरा देऊ नका जास्त रक्कम उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर...

एक रुपयात पिक विमा भरा देऊ नका जास्त रक्कम उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांचे आवाहन

296

 

विकी वानखेडे यावल

खामगांव, दि24 मा. आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र जा.क्र./प्रापिदियो /सा-८/२२३४१/२०२३ दि.०५/०७/२०२३ अन्वये शासनाने सन २०२३-२४ पासुन सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शेतकरी विमा हप्त्याची रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे

त्यामुळे शेतक-यांना केवळ १/- रुपया भरून PMFBY पोर्टलवर स्वत: शेतकरी यांना तसेच विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल पिक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करण्याकरीता सामुहिक सेवा केंद्र (csc) केंद्र धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रक्कम रु ४०/- देण्यात येत आहे या व्यतीरीक्त खामगांव उपविभागातुन (खामगाव / शेगांव) सामुहिक सेवा केंद्र (CSC) में केंद्र धारक शेतक-यांकडुन अतिरीक्त पैसे घेत असल्याबाबत च्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत..

त्याअनुषंगाने याद्वारे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, सामुहिक सेवा केंद्र (CSC) येथे सदर योजनेची नोंदणी करताना आवश्यक ते कागदपत्रे घेवून नोंदणी करावी नियमानुसार निर्धारीत करण्यात आलेल्या रकमेचाच भरणा करावा त्या व्यतीरीक्त अतीरीक्त पैसे देण्यात येवू नये सामूहिक सेवा केंद्र (csc) चे केंद्र धारक शेतक-यांकडुन अतिरीक्त पैश्याची मागणी केल्यास त्याबाबत संबंधीत तालुक्याचे तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी खामगांव यांचेकडे तक्रार दाखल करावी असे आव्हान खामगाव उपविभागीय अधिकारी, डॉ. रामेश्वर पुरी यांनी केले.

Previous articleबाजीराव माणिकराव पाटील यांची विरावली विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड
Next articleजलंब सरपंचांनी कमिशनरूपी भ्रष्टाचाराच्या पैशातून केलेल्या कामाची चौकशी करावी.