Home बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान ग्रस्तांना तात्काळ सानुग्रह मदत , स्थलांतरण...

खासदार प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान ग्रस्तांना तात्काळ सानुग्रह मदत , स्थलांतरण तसेच राशन सुविधा उपलध करून देण्याचे प्रशासनाला निर्देश..

93

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव तालुक्यात अतिवृष्टी मुळे संपूर्ण शेती जलमय होऊन नागरिकांच्या घरात पाणी गेले होते त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी खातखेड , बोंडगाव, मनसगाव, भोनगाव, सगोडा, भास्तन या गावाची प्राथमिक पाहणी केली

जनतेला सुरक्षित आणि सजग रहाण्याचे आवाहन केले. शेगाव तालुक्यातील विविध गावात पूरस्थिती आहे. 18,जुलै ते 23 जुलै दरम्यान अतिवृष्टी झाली. शेगाव तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला. रात्रीच्या सुमारास जोरदार पावसामुळे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. अन्नधान्य व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अतिवृष्टीच्या संकटामुळे नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतीला सुद्धा याचा फटका बसला आहे. त्यामुळे हे संकट सर्वांसाठीच मोठे संकट ठरले आहे. या नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी,

यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असतो. या वेळीसुद्धा त्यांना सर्वकष मदत मिळावी, यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितलं.

यावेळी उपजिल्हा प्रमुख राजू पाटील मिरगे, माझी उपजिल्हा प्रमुख संतोष लीप्ते, शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर , उपतालुका प्रमुख मोहन लांजुळकर, आशिष मिरगे, राठोड कृषी सहायक, खेळकर कृषी सहायक , तलाठी डाबेराव , तलाठी वानखेडे, तलाठी मोरे, गोपाल बाठे, उमेश शेळके, भागवत उन्हाळे, आकाश थारकर, अनिल जुमले, मंगेश गायकी आणि इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleयावल शहरात विस्तारीत भागात राहणाऱ्या शिक्षकाचा अचानक विहिरीत तोल जावुन पडल्याने दुदैवी मृत्यु
Next articleसरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला मदत द्या नंदाताई पाऊलझगडे यांची मागणी