Home बुलढाणा मणिपूर मधील त्या नराधमांना कठोर शिक्षा करा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची...

मणिपूर मधील त्या नराधमांना कठोर शिक्षा करा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

186

 

जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख सह खामगाव तालुका प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर मॅडम

भारताच्या अविभाज्य घटक असलेल्या मणिपूर राज्यात महिलांची धिंड काढून संपूर्ण महिला जातीचा अपमान करणाऱ्या नराधमांना अटक करून त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई मणिपूर शासनाने करावी.

अशी मागणी राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांना राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने तहसीलदार शेगाव यांच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे आज 26 जुलै रोजी शेगाव येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने राष्ट्रपती यांना तहसीलदार समाधान सोनवणे यांच्यामार्फत मनिपुर घटनेचा तीव्र निषेध करत दोषी असलेल्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन भारताच्या महामयीन राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे.

निवेदन देताना राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी ताई शर्मा, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ रत्‍नाताई डिक्कर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सौ किरण ताई लंगोटे, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षा सौ प्रणिता धामंदे, सौ.अलकाताई बांगर, खामगाव शहर अध्यक्ष सौ रंजनाताई राठोड चव्हाण मॅडम आधीच राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अनेक भगिनी उपस्थित होत्या

Previous articleसरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला मदत द्या नंदाताई पाऊलझगडे यांची मागणी
Next articleमनिपुर प्रकरणाचा काग्रेसने केला निषेद नायब तहसीलदाराला दिले निवेदन