Home वर्धा मनिपुर प्रकरणाचा काग्रेसने केला निषेद नायब तहसीलदाराला दिले निवेदन

मनिपुर प्रकरणाचा काग्रेसने केला निषेद नायब तहसीलदाराला दिले निवेदन

255

 

सिंदी रेल्वे ता.२६ : शहर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून मनीपुरच्या अमानुष प्रकरणाचा आणि त्यावर कारवाई शुन्य काम करणाऱ्या मनीपूर राज्य शासन आणि केंद्र सरकारचा जाहिर निषेद करुन नायब तहसीलदार यांना बुधवारी (ता.२६) निवेदन देण्यात आले.

शहरातील गांधी चौकात सकाळी ११ वाजता शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित निषेद मोर्चात शेतकरी संघटना, शिवसेना(उ.ब.ठ.) आदी तिन्ही पक्षाचे शेकडो महीला-पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोळा होत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत शहराच्या मुख्य रस्त्यांने जात नायब तहसीलदार कार्यालयात उपस्थित नायब तहसीलदार मधुकर ठाकरे यांना निषेदाचे निवेदन देऊन जाहिर निषेद नोंदविला.

याप्रसंगी सर्व पक्षाच्या नेते मंडळीनी मोर्चातील जनसमुदायाला संबोधीत केले. *सेलु तालुका प्रतिनिधी :- गुड्डू क्युरेशी*

Previous articleमणिपूर मधील त्या नराधमांना कठोर शिक्षा करा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..
Next articleश्रींच्या पालखीचे दर्शन घेताना गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास